Press "Enter" to skip to content

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर वाशिवली ठाकूरवाडीतील रस्त्याचे डांबरीकरण

आदीवासी बांधवांकडून सरपंच गौरी महादेव गडगे यांचे आभार !

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

खालापूर तालुक्यात नाव लौकिक असलेल्या वडगाव ग्रामपंचायतीवर गौरी महादेव गडगे या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर अनेक विकासकामांना प्राधान्य देत परिसराचात विकासकामांची गंगा सुरू आहे.

ग्रुप ग्रामपंचायत वडगांव हद्दीतील मौजे वाशिवली ठाकूरवाडी येथे भारत देशस्वातंत्र झाल्यापासून आजतागत या रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावरील झाडीझुडपांतून मार्ग शोधत प्रवास करताना आदीवासी बांधवांना सर्पदंश व इतर जनावरांचा हल्ला झाल्याने अनेकांनी आपला जीव गमावला आहे.या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब नागरिकांना, विद्यार्थी, वयोवृध्द नागरिक तसेच गावातील एखादी व्यक्ती आजारी झाल्यास तसेच गरोदर महिलेला उपचाराकरीता घेऊन जान्यासाठी डोली करून डोंगर माथ्यावरुन खाली मुख्य रस्त्यावर आणावे लागत होते.

याबाबत ग्रामस्थांना नेहमीच वाटत असायचे की आपले दुःख जाणनारा कोणीच नाही.अनेकदा निवडणुक आल्या कि आश्वासने मिळायची परंतु नंतर “जैसे थेच”.अखेर ग्रामपंचायत सदस्य महादेव गडगे यांच्या कडे आदीवासी बांधवांनी मागणी केली.महादेव गडगे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आदिवासी बांधवांनी समस्यांचा पाढाच वाचला.

यावेळी महादेव यांनी समस्या सरपंच गौरी गडगे यांना सांगितल्या आणि यशस्वी प्रयत्न करून ग्रामपंचायत निधीच्या माध्यमातून या कामाचे भुमीपुजन सरपंच गौरी महादेव गडगे यांच्या शुभहस्ते करुन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले.

वाशिवली ठाकूरवाडीतील हा रस्ता १२०० मीटर लांबीचा डांबरीकरण रस्ता आहे.या रस्त्याचे डांबरीकरण सुरू झाल्याने आदीवासी बांधवांच्या चेह-यावर समाधानाचे वातावरण दिसून आले.याप्रसंगी सरपंच गौरी महादेव गडगे ,निता संदीप पाटील ( सदस्या ) , राजेश बाळा पाटील ( सदस्य ),महादेव कमलाकर गडगे ( सदस्य ) ,शिवाजी तुकाराम शिंदे ( सदस्य ) ,चंद्रकला परशुराम वाघमारे (सदस्या ) , संदीप शंकर पाटील ,काशिनाथ नामदेव भला , संतोष लडकू पाटील ,संतोष दत्तात्रेय गडगे , मदन दत्तात्रेय ठोंबरे ,संदीप बाळू शिंदे ,आशिर्वाद गडगे , तुळशीराम चिमा ठोंबरे ,राम बामा पारधी ,सुरेश पारधी आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.