सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील सर्पमित्र तथा सापांबद्दल जनजागृती करणारे प्रमेय जाधव याने वाघेश्वर नगर रोठ खु.येथील चंद्रभागा सोसायटी परिसरात सुमारे आठ फुटी अजगराला सुरक्षितरित्या पकडून जीवदान दिले आहे.
चार दिवसांपूर्वी प्रमेय याने त्याच परिसरातील साई आँटो गँरेज व मुठवली खु.येथे भयंकर विषारी असणाऱ्या दोन कोब्रा जातीच्या सापांना पकडून जीवदान दिल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा सर्पमित्र प्रमेय याने त्याच परिसरातील चंद्रभागा सोसायटीमध्ये आठ फुटी अजगराला मोठ्या कौशल्याने पकडुन सुरक्षितरित्या जंगल भागात नेऊन सोडले आहे.
चंद्रभागा सोसायटी परिसरात ब-याच दिवसांपूर्वी अजगर फिरत असल्याचे अनेकांच्या द्रुष्टीस पडले होते.त्यामुळे अजगराबाबत थोडीफार भिती ही काही जणांच्या मनात होती.आज तेथील रहिवासी वर्गाच्या द्रुष्टीस अजगर पडले असता प्रमेय जाधव याला याबाबत माहिती दिली असता प्रमेय यानेही क्षणाचाही विलंब न लावता बिनविषारी अजगरास हातोहात पकडून आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली.
ब-याच जणांनी तसेच लहान मुलांनीही प्रत्यक्षात कधीच अजगर पाहिला नसल्याने प्रमेय याने पकडलेल्या अजगरास पाहण्यास येथील रहिवासी वर्गाची मोठीच गर्दी झाली होती. दरम्यान प्रमेय याच्या या धाडसाबद्दल सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.








Be First to Comment