Press "Enter" to skip to content

जि.प.स.पद्माताई पाटील यांच्या हस्ते इसांबे येथे गणेश घाटाचे भूमिपूजन

सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |

ग्रूप ग्राम पंचायत इसांबे हद्दीतील असलेल्या तलावाची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे मात्र या तलावाची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे ग्रामपंचायतीने यांनी सातत्याने पुढाकार घेवून या ठिकाणी तलावाचे शुशोभिकरण करण करुन गणेश घाट बांधण्यात यावे यासाठी सातत्याने प्रयत्न करीत होते.यासाठी राष्ट्रवादि नेते सुरेश पाटील यांच्याकडे वेळोवेळी या तलावाचे शुशोभिकरण करण्याचा पाठपुरावा केल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पद्ममाताई सुरेश पाटील यांच्या जिल्हा परिषद जनसुविधा फंडातून गणेश घाट बांधकामसाठी निधी मंजूर करण्यात आल्यामुळे आजच त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गणेश घाटाचे ( गणपती विसर्जन घाट ) भूमिपूजन करण्यात आले.

ग्रूप ग्राम पंचायत इंसांबे येथे तलाव असले तरी सुद्धा गेल्या काही वर्षामध्ये त्यांची मोठी दुरावस्था निर्माण झाल्यामुळे येथिल ग्रामस्थांना हे पाणी वापरण्यास खूप समस्या निर्माण होत होत्या,या तलावाळा वर्षाचे बारा महिने पाणी असल्यामुळे ह्यांचा वापर विविध कामासाठी येथिल ग्रामस्थ करीत होते.त्याच बरोबर गुरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत होते. पाणी म्हणजे जिवन असे असले तरी सुद्धा पाणी काटकसरीने वापरावे किंवा जे पाणी दुषिद्ध होत असेल तर त्यांचे शुद्धीकरण करावे कारण जल है तो हम है या पंक्ती प्रमाणे या पाण्याचा योग्य वापर व्हावे.शिवाय या ठिकाणी गणेश घाट बांधल्यामुळे साहजिकच हे पाणी शुद्ध होइल त्याच बरोबर येथिल असलेला गाळ सुद्धा काढून या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजिन करण्यात येइल

यावेळी या गणेश घाट भूमीपूजन सोहळ्यास जि.प.सदस्या पद्माताई सुरेश पाटील,राष्ट्रवादी नेते सुरेश पाटील, विश्वनाथ पाटील,नरेश पाटील,सरपंच पल्लवी देवघरे,उपसरपंच अनंता पाटील, ग्रामसेवक – विजय नलावडे, वडगाव ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार पाटील, हरेश पाटील ग्रामपंचायत सदस्य भरत पाटील,सदस्या हेमलता देवघरे,ताई हिलम, मा.उपसरपंच विष्णू देवघरे, पोलिस पाटील अनंता देवघरे,किशोर देवघरे,सतीश महाब्दी ,समीर देवघरे, विकास देवघरे, अर्जुन देवघरे,मंगेश ओमले, अदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.