सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत नगरपरिषद हद्दीत करमरकर यांच्या घरापासून कृषिसंशोधन केंद्रातून उल्हास नदी पर्यत मुख्य नाला बांधण्यात आला आहे या नाल्यावर तातडीने स्लॅब टाकण्याची मागणी भाजपने नगरपरिषदेकडे केली आहे.
करमरकर यांचे घरापासून कृषिसंशोधन केंद्रातून उल्हास नदी पर्यत नगरपरिषदेने काँक्रिटचे गटार बांधले आहे, या गटारावर अंदाजपत्रकात स्लॅब होता परंतु प्रत्यक्षात गटार बांधुन झाले मात्र त्यावर स्लॅब केलेला नाही नगरपरिषदे कडे विचारणा केली असता कृषिसंशोधन केंद्राने गटार जास्त रुंद करायला लावल्याने अंदाजपत्रकिय रक्कम पूर्ण खर्च झाली त्यामुळे स्लॅब करता आला नाही असे सांगितले.परंतु आज मितीस एवढे मोठे खोल गटारात लहान मूल गुरढोरे पडून दुर्दैवी घटना घडू शकते. तसेच गटार तुंबून दुर्गंधी आणि डास वाढून रोगराई पसरू शकते, म्हणून नगरपालिका फंडातून आर्थिक तरतूद करून ताबडतोब गटारावर स्लॅब करावा असे निवेदन नगराध्यक्षा आणि मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद यांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुनील गोगटे, सुर्यकांत गुप्ता, बिलाल आढाळ,सर्वेश गोगटे यांच्या वतीने देण्यात आले आहे.








Be First to Comment