सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
शिवकार्य ट्रेकर्स दुर्गसंवर्धन ग्रुप चौक खालापूर यांच्यावतीने किल्ले सोंडाई दुर्गवर गडावरील सर्वात मोठं पाण्याचं खांब टाकं संवर्धन मोहीम नुकतीच संपन्न झाली.
उपवनसंरक्षक ,अलिबागचे आशिष ठाकरे साहेब व वनक्षेत्रपाल कर्जतचे निलेश भुजबळ साहेब यांच्या सहकार्याने आणि शिवकार्य ट्रेकर्स दुर्गसंवर्धन ग्रुपचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सरांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली. शिवकार्य ट्रेकर्स चे संस्थापक रोहिदास ठोंबरे यांच्या जन्मदिनानिमित शिवकार्य ट्रेकर्समधील सह्याद्रीच्या वाघांनी ही मोहीम यशस्वी केली.या मोहिमेत सोंडाई दुर्ग वरील सर्वात मोठं पाण्याचं खोल टाकं, जे एकमेव पिण्याच्या पाण्यासाठी उपयुक्त आहे. त्यात भरपूर प्लास्टिक कचरा आणि सर्व पाणी शैवाल युक्त हिरवा झाला होता.जवळपास अडीच तासाहून अधिक वेळ न थांबता या पाण्याच्या टाक्यांतील सर्व प्लास्टिक कचरा आणि शैवाल काढून टाकण्यात आला.खराब पाणी काढून या खांब टाक्याला सत्तर टक्के तरी कचरामुक्त केला आहे.
आगामी काळात या टाक्यांतील संपूर्ण गाळ काढून त्याला नवसंजीवनी देण्यात येणार आहे,असा संकल्प शिवकार्य ट्रेकर्स टीमने सोडला आहे.

या मोहिमेच्यावेळी सभोवतालचा व जवळचा संपूर्ण परिसर स्वच्छ केला गेला.सोंडाई दुर्गवर शिवकार्य ट्रेकर्स दुर्गसंवर्धन ग्रुपच्यावतीने गेली चार वर्षे संवर्धन मोहीम आयोजित केली जात आहे.
आगामी काळात या सोंडाई दुर्गला नवसंजीवनी देण्यासाठी शिवकार्य ट्रेकर्स टीम प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.या संवर्धन मोहिमेत शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सर,
मंदार उतेकर,बबन झोरे,गिरीश जाधव,योगेश जाधव,संचित शिंदे,प्रतीक पवार,समाधान गावंडे, जयेश भालेकर व विकास मालुसरे यांनी सहभाग नोंदवला.सध्या शासन नियमावलीनुसार अगदी मोजकेच सह्याद्रीचे मावळे यात सहभागी झाले होते.

देवी सोंडाई माते च्या या सोंडाई दुर्गवर नियमित सेवा करणे आणि त्याची निगा राखणे आमचे कर्तव्य आहे .याच कर्तव्याचा भाग म्हणून ही सोंडाई किल्याची श्रमदान मोहीम आम्ही हाती घेत असतो असे मत प्रत्येक शिवकार्य ट्रेकर्स सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी व्यक्त केले आहे.
तर सोंडाई दुर्गच्या पायथ्याशी असलेल्या बोरगाव ग्रामपंचायतीच्या सोंडेवाडी, वाघेश्वर येथील आदी ग्रामस्थांनी शिवकार्य ट्रेकर्स दुर्गप्रेमी यांचे स्वागत केले आहे.








Be First to Comment