सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत नगरपरिषद हद्दीतील विठ्ठलनगर परिसरात कुत्र्यांनी हैदोस घातला आहे, मोटर सायकल चे सीट फाडल्याची घटना घडली आहे त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.
नगरपरिषदेच्यावतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण होत नसल्याने दर सहा महिन्यांनी कुत्र्यांची संख्या वाढत आहे, यावर नगरपरिषदेने उपाययोजना करणे गरजेचे आहे, नगरपरिषद हद्दीत कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे, पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या सुमारास एकटा नागरिक रस्त्याने जात असल्यास कुत्र्यांचा घोळका नागरिकांच्या अंगावर येत असल्याच्या घटना समोर येत आहे, तर रात्रीच्या वेळेस जोरांत भूकन्याने नागरिकांची झोपमोड होत आहे.

नगरपरिषद हद्दीत वेगवेगळ्या परिसरात कुत्र्यांची टीमच्या टीम दिसत आहे, आज विठ्ठल नगर परिसरात युवराज आपारमेंट मधील काही नागरिकांच्या मोटरसायकलच्या सीट कुत्र्यांनी फाडून टाकल्याच्या घटना समोर आली आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिक घबराटीच्या सावटात आहेत, आज गाडीच्या सीट फाडल्या उद्या हे कुत्रे लहान मुलांना चावण्यास कमी करणार नाहीत अशी शंका या परिसरातील नागरिक मधुकर शेलवले यांनी व्यक्त केली आहे, नगरपरिषदेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.








Be First to Comment