Press "Enter" to skip to content

म.रा.शि.प.यांच्या वतीने वाँटर फिल्टर व सिलिंग फँनची भेट

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ता.रोहे शाखेचे वतीने पं. समिती रोहा शिक्षण विभाग येथे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वाँटर फिल्टर व एक सिलींग फँन भेट देण्यात आला आहे.

राष्ट्रहित,विद्यार्थीहित,शिक्षणहित व शिक्षकहित या ब्रीद वाक्यप्रमाणे समाजात सेवाभावी व्रुत्तीने काम करणारी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना म्हणून आपली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग ही आपल्या कामाच्या धडाक्यामुळे आज राज्यभरात शिक्षकांमध्ये लोकप्रिय बनली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रोहाच्या वतीने पंचायत समिती रोहा शिक्षण विभाग येथे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी पाणी शुद्धीकरण यंत्र व एक सिलींग पंखा देण्यात आला

सदर प्रसंगी रोहा पं.समिती उपसभापती रामचंद्र सकपाळ,माजी सभापती लक्ष्मण महाले, गटविकास अधिकारी श्रेणी२ राठोड साहेब प्रसाशन अधिकारी पं सं रोहा संजय कवितके, गटशिक्षणाधिकारी सादूराम बांगारे तसेच संघटनेचे पदाधिकारी उमेश महाडेश्वर, कोकण विभाग प्रतिनिधि तालुका अध्यक्ष खेमसिंग चव्हाण कार्यवाह सुभाष कांबळे‌,व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.म.रा.शि.परिषदेच्या या उपक्रमाचे समाजातील विविध स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.