सिटी बेल । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे ।
रोहा तालु्क्यातील – वरसे ग्राम पंचायत हद्दीतील भुवनेश्वर निरलॉन कॉलनी येथील रहिवासी धोंडू विश्राम माने यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
धोंडू विश्राम माने यांनी शासनाच्या कृषी विभागामध्ये सेवानिवृत्ती पर्यंत सेवाकार्यकाल पूर्ण केले ते रोहे-भुवनेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते,जय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. नितीन माने यांच्या वडिल होत.अतिशय शांत,व प्रेमळ – मन मिळाऊ स्वभाव,परमार्थाची गोडी असलेले असा त्यांचा स्वभाव होता.
त्यांच्या दु:खद निधनाने वृत समजतात समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळींसह त्यांचे आप्तस्वकीय मित्र परिवार व सगेसोयरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेत त्यांच्या परिवाराचे सात्वंन केले.
कोरोना विषाणू संसर्गाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाच्या प्रचलित नियमांचे पालन करीत कमीत – कमी नातेवाईकांच्या उपस्थितांमध्ये त्यांचे अंतसंस्कार विधी उरकण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून,नातवंडे,सगे- सोयरे नातेवाईक असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि.०७जून रोजी सकाळी कुंडलिका नदीच्या तीरावर होतील तर अंतिम धार्मिक विधी तेरावे गुरुवार दि.१० जून रोजी राहत्या घरी भुवनेश्वर निरलॉन कॉलनी येथे होतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले..








Be First to Comment