Press "Enter" to skip to content

धर्मा बामणे सन्मानाने सेवानिवृत्त

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी गावचे सेवाभावी व्यक्तिमत्त्व धर्मा पांडुरंग बामणे हे धाटाव औद्योगिक वसाहतीमधील रेप्टा काँस कंपनीतून ता.३१ मे रोजी वयोमानापरत्वे आपल्या सेवेतून सन्मानाने सेवानिवृत्त झाले.

एक शांत,संयमी व सर्वांशी मिळून मिसळून वागणारे तसेच सामाजिक कार्यात नेहमीच मोलाचे योगदान देऊन कार्य करणारे धर्मा बामणे यांचे रेप्टा काँस कंपनीत देखील सर्वांशी सौदार्याचे व आपुलकीचे संबंध होते. तर आपल्या सेवाकाळात त्यांनी कंपनीमध्ये प्रामाणिक सेवा करून व वेळोवेळी मिळेल ती जबाबदारी पाडली.त्यांच्या निव्रुत्तीप्रित्यर्थ कंपनी व्यवस्थापनाने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी प्रोडक्शन मँनेजर श्री.पाटील, निपाणी,धाईंजे,अजित पाटील, ज्वन्जल, अशोक कोस्तेकर, किसन ठाकूर,रघुनाथ बामुगडे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सहकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या या सेवानिवृत्तीप्रित्यर्थ तळवली तर्फे अष्टमी ग्रामस्थ, महिला मंडळ व जय हनुमान क्रीडा मंडळाचे सदस्य तसेच त्यांचे आप्तस्वकीय, मित्र परिवार व समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्याकडूनही त्यांच्या भावी आयुष्याबद्दल सुयश चिंतन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.