कोरोनाच्या काळात शिवभोजन थाळी,अदिवासी बांधवांना धान्य वाटप
सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
वाढदिवस हा आपल्या जिवनातील अमुल्य असा दिवस ह्या क्षणांची प्रत्येक जण वाट पाहत असतो.मात्र वाढदिवस साध्य पद्धतीने करून गोर गरिब यांच्या मुखामध्ये घास गेला तर ख-या अर्थाने त्यांचे महत्त्व खूप वाढते.ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव यांनी आपला वाढदिवस ची सुरुवात ही सकाळी मोहपाडा येथिल शिव भोजन थाळी २०० वाटप करुन करण्यात आली.तसेच सायंकाळी पौध आदिवासी वाडीमध्ये ७० नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले.
कोरोनांच्या पाश्वर्भूमीवर प्रत्येकाला पोटभर अन्न मिळते असे नाही.मात्र एक दिवस का होइना पोटभर अन्न खाण्यास मिळाले तेच आशीर्वाद आपल्याला महत्वाचे. गेल्या वर्ष भरापासून आपल्यावर आलेले संकट अजूनही थैमान घालत आहे.याच पाश्वर्भूमीवर अनेकांना रोजगाराला मुकावे लागले.तर काहींना एक वेळची जेवनांची भ्रांत ही परस्थिती अनेकांच्या वर ओढली गेली आहे.त्याच बरोबर हातावर पोट भरण्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे.
कोरोना मुळे व्यवसाय करणे अवघड झाले असून शिवाय रोजगार ही मिळत नाही.आशा वेळी विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते सातत्याने मदतीला धावत असतात.मात्र आज वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या चेहऱ्यावर समाधानांचे हावभाव आज वाढदिवसाच्या निमित्ताने पाहावयास मिळाले.
गेले अनेक वर्ष राजकारण सक्रिय असलेले माजगांव सरपंच गोपीनाथ जाधव हे सातत्याने जनसामान्यांत सहवासात राहत आहे. त्यांचे दुख जवळून पाहत आहे.यामुळे राजकारण करीत असतांना समाजसेवा ही तेवढ्या जिद्दीने करीत आहे.आज वाढदिवसाचे निमित्त होते.मात्र सातत्याने गरीब गरजू यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत आहे.
याप्रसंगी सरपंच गोपिनाथ जाधव, सदस्य नितीन महाब्दी, भरत पाटील, अविनाश कांबळे, कल्पना वाघे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील, जनार्दन जाधव, जयेश पाटील, तुकाराम जाधव, रमाकांत जाधव, विलास कांबळे, जयवंत पाटील, काशिनाथ जाधव, पांडुरंग जाधव, अक्षय महाब्दी, सुनिल महाब्दी, प्रशांत जाधव, अक्षय जाधव, पंकज जाधव, प्रसाद जाधव, नामदेव वाघे, गोविंद वाघे, सुनिल वाघे, शिवाजी शिंदे, महादू वाघे आदी प्रमुखासह आदीवासी बांधव उपस्थित होता.








Be First to Comment