Press "Enter" to skip to content

सीटी बेल च्या बातमीचा इफेक्ट

सावरोली खारपाडा मोरीच्या ठिकाणी पडलेल्या खड्याचे तातडीने काम करुन खड्डा भरण्यात आला

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

सावरोली – खारपाडा या रस्त्यांचे काम उत्तम प्रकारे झाले असून मात्र पावसाळ्यात रस्ता किंवा मो-या खचत असतात.असाच प्रकार आंबिवली येथिल असलेल्या ब्रीज च्या खाली पडला होता.मात्र या खड्यापासून मोठा अपघात होवू शकतो.मात्र ही बातमी सीटी बेल मध्ये प्रकाशित होताच संबधित खात्यांने या ठिकाणी लक्ष वेधून तातडीने ह्या ठिकाणी पडलेला खडा भरला गेल्यामुळे येथून प्रवास करणारे समाधान व्यक्त करीत आहे.

सावरोली – खारपाडा या रस्त्यावरील पावसाळ्यात रस्त्याच्या बाजुची माती ओळी झाली की,रस्त्याला भेगा पडतात अथवा ज्या ठिकाणी मो-या आहेत त्या ठिकाणी भाग खचला जातो परिणामी त्या ठिकाणी खड्याचे स्वरूप निर्माण होता.काही वेळा हा खड्डा निदर्शनास न आल्यास मोठा अपघात होवू शकतो.मात्र तसे होवू नये यासाठी ही बातमी सीटी बेल मध्ये प्रकाशित होताच संबधित अधिकारी जावून या ठिकाणी पाहणी करून खड्डा भरण्यात आला.

या ठिकाणी पडलेला खड्डा चे काम तातडीने केल्यामुळे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहे.तसेच बातमी प्रकाशित होताच संबंधित खात्याला जाग येवून या ठिकाणी खड्डा भरल्यामुळे प्रवासी वर्गांचे समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.