सिटी बेल । अलिबाग । अमूलकुमार जैन ।
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टरांप्रमाणेच पोलिसांचे योगदान मोलाचे आहे,लॉकडाऊन मध्ये पोलिसांनी आपल्या दांडूक्यांनी बऱ्याच जणांना वठणीवर आणल्याच्या क्लिप मोबाईलवर आपण पाहिल्या आहेत,परंतु पनवेल व अलिबाग न्यायालयात सध्या कार्यरत असलेले तसेच अलिबाग पोलीस मुख्यालयात पैरवी कर्मचारी म्हणून काम करीत असलेले सचिन भास्कर खैरनार यांनी मानवतेचे दर्शन घडविले आहे,
अलिबाग ते पनवेल दरम्यान रस्त्यावर फिरणारे फिरस्ते यांना कोरोनाच्या बाबतीत कसलेही ज्ञान नाही,ते त्यांच्या दुनियेत जगत असतात मग सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या आरोग्यच व जीवनाचं काय? कित्येक दिवस आंघोळ करत नाही?अश्या फिरस्त्या साठी देवदूत म्हणून धाऊन आले ते पोलिस सचिन खैरनार. घाणेरडे,समाजापासून दूर गेलेले माणूस म्हणून तिरस्काराची वागणूक भेटलेले फिरस्त्याना पोलीस सचिन खैरनार यांनी स्वतःच्या पैशातून खरेदी केलेलं मास्क त्यांनी या फिरस्त्यांच्या तोंडाला लावले,त्यांचे हात,तोंड धुवून मायेने जवळ करून त्यांनी मास्क लावले.
एकीकडे कोरोनाशी चार हात करणारे पोलीस तर दुसरीकडे कोरोना होऊनये म्हणून कायद्याचा धकदाखवनारे दंडुकधारी पोलीस आहेत,मानवतेचा दिंडोरा वाजवणारे मात्र स्वतःचा जीव वाचवत गप्प घरात असताना पोलीस म्हणून केवळ ड्युटी करणारा पोलीस नव्हे तर समाजाचा देणेकरी म्हणून माणुसकी जपणारा ही पोलिस असतो हेच आपल्या कृतीतून पोलीस सचिन खैरनार यांनी दाखवून दिले आहे.
वेडे,भिकारी,फिरस्ते जरी असले तरी ती सुद्धा माणसंच आहेत,त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, दंडुक्याधारी ओळख असलेला पोलीसही माणसातला माणूस म्हणून दुसऱ्याला जगवतो याची जाणीव आज सचिन खैरनार यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले आहे.
पोलिसखात्या बरोबरच समजातील सामाजिक संघटना कडून खैरनार यांचे कौतुक केले जात आहे.








Be First to Comment