सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील खांब येथील रहिवासी असणारे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक नारायण विष्णू वेदक यांचे माणगाव येथील सिव्हिल हाँस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान पँरँलिसचा झटका आल्याने दु:खद निधन झाले.त्या समयी ते ८८ वर्षांचे होते.
एक अष्टपैलू व आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत रायगड जिल्ह्यातील पेण,पोलादपूर येथे तर रोहे तालुक्यातील चिल्हे,शिरवली,तळवली त.अष्टमी व गोवे येथे शैक्षणिक कार्य करून सन्मानाने सेवानिवृत्त झाले.कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीचे पालन करून त्यांचे अंत्यविधी संपन्न करण्यात आले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली,सुन,जावई असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुध.दि.२ जून रोजी तर अंतिम धार्मिकविधी शुक्रवार दि.४ जून रोजी शुभलाभ सोसायटी,संतोषनगर महाड येथील निवासस्थानी संपन्न होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment