Press "Enter" to skip to content

अ.भा.हिं.महासभा रोहे तालुकाध्यक्षपदी विलास धामणसे यांची नियुक्ती

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे

स्वातंत्र्यवीर सावरकर प्रणित अ.भा.हिं.महासभा या ऐतिहासिक राजकीय पक्षाच्या रोहे तालुकाध्यपदी तालुक्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या वैजनाथ या गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते विलास धामणसे यांची नियुक्ती करण्यात आली असून तशाप्रकारचे नियुक्तीपत्र नुकतेच त्यांना पक्षाच्या एका कार्यक्रमात अखिल भारत हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष अध्यक्ष मधुकर महादेव खामकर यांच्या तसेच अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल रामराव पवार उपाध्यक्ष अरुण आत्माराम माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढविण्यासाठी व रोहे नगरपालिका क्षेत्र, कोलाड, नागोठणे, खांब,चणेरा, धाटाव आदी तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाणी पक्षाच्या शाखा स्थापन करण्यासाठी तसेच तालुक्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत व्हावे यासाठी रोहे तालुका कार्यकारिणीची नियुक्ती करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या या नियुक्तीचे समाजातील सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.