Press "Enter" to skip to content

सर्पमित्र प्रणय जाधव याने दोन कोब्रा जातीचे सापांना दिले जीवदान

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहू तालुक्यातील रैठ खु.येथील वाघेश्वर नगर येथील रहिवासी असणाऱ्या व सर्पमित्र म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या सर्पमित्र प्रणय जाधव याने अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या दोन कोब्रा जातीच्या सापांना पकडुन त्यांना जीवदान दिले आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,रोठ खु. वाघेश्वर नगर येथील भरत मालुसरे यांचे रोहे-कोलाड मार्गावर असणाऱ्या साई अँटो गँरेज येथे दोन दिवसापूर्वी सायंकाळच्या वेळेस यावेळी येथील मँकँनिक जगदीश तुपकर यांच्या द्रुष्टीस सदरचा कोब्रा साप द्रुष्टीस पडला असता त्यांनी लगेचच सर्पमित्र प्रणय जाधव याच्याशी संपर्क साधला असता प्रणय जाधव यानेही ताबोडतोब गँरेजजवळ येऊन अडचणीत असलेल्या कोब्रा सापाला मोठ्या शिताफीने पकडून जीवदान दिले.तर दुसऱ्या घटनेत प्रणय जाधव याने मुठवली खु.येथील केतन ठमके यांच्या घराच्या परिसरात आढळलेल्या दुसऱ्या कोब्रा सापास जीवदान दिले.प्रणय जाधव याने दोन्ही ठिकाणी दोन्ही कोब्रा जातीचे विषारी सापांना मोठ्या शिताफीने पकडून दूरवर जंगल भागात सुरक्षितरित्या सोडले आहे.तर प्रणयच्या या चातुर्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे. तर त्याने आतापर्यंत शेकडो विविध जातीच्या विषारी व बिनविषारी सापांना पकडून जीवदान दिले आहे.

साप कोणताही असो दिसताक्षणी त्याला मारु नका तर माझ्याशी संपर्क साधा अशाप्रकारचे अवाहन तो सगळीकडे करीत असतो.याशिवाय साप हे निसर्ग साखळीतील महत्त्वाचे घटक असून त्यांना न मारता त्यांनाही जगू दिले पाहिजे.अशाप्रकारचे प्रबोधनही तो सापांच्या बाबतीत सगळीकडे करून समाजात सापांबद्दल असणारे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न करीत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.