Press "Enter" to skip to content

पोलीस मित्र संघटनेकडून रसायनी पोलिसांना मास्क व सॅनिटायझर वाटप

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

स्वराज्य पोलीस मित्र ,पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनाअंतर्गत पोलीस मित्र संघटना खालापूर तालुक्याच्यावतीने राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे , महासचिव कमलेश शेवाळे, प्रदेशाध्यक्ष अमर बेंद्रे, पोलीस मित्र प्रदेशाध्यक्ष वजीर शेख यांच्या नेतृत्वाखाली व संपर्कप्रमुख कौसर भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना सामाजिक बांधिलकी जपत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.

संपूर्ण जगावर कोविड – १९ च्या महामारीने थैमान घातले असून यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. डॉक्टर , पोलीस , सफाई कर्मचारी या सर्वांनी आपला जीव धोक्यात घालून जनतेची सुरक्षा केली आहे.

महत्वाचं म्हणजे पोलीस बांधवांनी अहोरात्र मेहनत करत जनतेची सुरक्षा केली आहे. परंतु त्यांची सुरक्षा देखील तितकीच महत्वाची आहे या अनुषंगाने पोलीस मित्र संघटना खालापूर तालुक्याच्यावतीने रसायनी पोलीस स्टेशन येथे पोलीस बांधवांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस मित्र संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील, उपाध्यक्ष जयेश तांडेल, सचिव प्रितेश बोंबे,
संपर्क प्रमुख निखिल सुर्वे,कर्जत तालुका उपाध्यक्ष भूषण कडू , खालापूर तालुका अध्यक्ष सुरेश पारींगे ,उपाध्यक्ष संतोष गायकवाड ,सचिव भूषण म्हात्रे , सहसचिव वासुदेव पाटील, संपर्क प्रमुख संदीप भोईर, संघटक नितेश म्हात्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.