सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
माजी आमदार सुरेश लाड यांच्या बेताल वक्तव्याचा कर्जत तालुक्यातील शिवसेनेने रस्यावर उतरून जाहीर निषेध केला.
कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालये ही वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने तालुक्यातील ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कर्जत तालुका प्रशासकीय भवन इमारतीच्या भूमीपूजनाला 27 मे रोजी झाले, मात्र या भूमिपूजन सोहळ्याला गालबोट लागले.
महाआघाडीतील मित्र पक्षातील आजी – माजी आमदारांनी दीड तासाच्या अंतराने आपल्या हस्ते वेगवेगळी भूमिपूजन केली. या भूमिपूजनात भाषणबाजीत दोघांनी एकमेकांवर आरोप केल्याने महाआघाडीतील तालुक्यातील बिघाडी चव्हाट्यावर आली आहे.

29 मे रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस ने राष्ट्रवादी भवन मध्ये आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध केला तर आज दि.1 जून रोजी दहीवली येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, येथे शिवसेनेने रस्त्यावर उतरून माजी आमदार सुरेश लाड यांचा जाहीर निषेध केला. यावेळी जिल्हा महिला संघटक रेखा ठाकरे, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, भरत भगत, संतोष भोईर, अमर मिसाळ, शिवराम बदे, बाबू घारे, मोहन ओसवाल,सायली शहासने, नदीम खान आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.








Be First to Comment