सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे ।
माथेरान मध्ये हर हर चांगभले धनगर समाजाच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली.
महात्मा गांधी मार्गावरील अहिल्याबाई होळकर चौकातील होळकर यांच्या नामफलकास धनगर समाजाचे जेष्ठ सदस्य रामचंद्र (बुवा)यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तर इंदिरा गांधी नगर येथील समाजमंदिरात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला धनगर समाज अध्यक्ष राकेश कोकळे,जेष्ठ कार्यकर्ते संतोष आखाडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी धनगर समाजाच्या महिला वर्ग त्याचप्रमाणे सर्व धनगर बांधवांनी शासनाच्या नियमांचे पालन करत ही जयंती अत्यंत साधेपणाने साजरी केली आहे. यावेळीनगरपरिषदेचे सभागृह गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक शकील पटेल, नरेश काळे, सिताराम कुंभार, मारुती कोकळे,,शिवमल्हार ग्रुपचे युवक शैलेश ढेबे, करन जानकर,भावेश झोरे, निलेश ढेबे, दीपेश ढेबे, ऋषीकेश झोरे, प्रशांत ढेबे, संतोष ढेबे यांसह अन्य उपस्थित होते.








Be First to Comment