Press "Enter" to skip to content

खालापूरात शिवसेना – राष्ट्रवादी जुंपली

खालापूरात शिवसेना कार्यकर्त्यांची माजी आमदार सुरेश लाड यांच्या विरोधात घोषणाबाजी

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या तीन – चार दिवसापासून पेटला असताना विद्यमान शिवसेना आमदार महेंद्र थोरवे व माजी राष्ट्रवादी आमदार सुरेश लाड यांच्यात मोठी शाब्दिक लढाई सुरू झाली असताना दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांन विरोधात घोषणाबाजी करीत निर्दशने होत आहेत.

सोमवार दिनांक ३० मे रोजी पालीफाटा येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार सुरेश लाड यांचे समर्थन करीत विदयमान शिवसेना आमदार याचा निषेध व्यक्त केला असता ३१ मे रोजी याच संदर्भात शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत माजी आमदार सुरेश लाड याचा निषेध व्यक्त करून लाड यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केल्याने कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना – राष्ट्रवादी असा पुन्हा संघर्ष सुरु झाला आहे.

महाराष्ट्र राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी – कॉग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार असताना कर्जत खालापूर मतदारसंघात शिवसेनेचा आमदार असल्याने नेहमीच प्रशासकीय कार्यक्रमांवरून शिवसेना – राष्ट्रवादीत धुसफूस सुरू आहे. नुकताच कर्जत तालुक्यात एक प्रशासकीय कार्यक्रमाच्या भूमिपुजन सोहळ्यामध्ये पालकमंत्री आदिती तटकरे व राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांना डावल्यामुळे राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थता असताना वाद उफाळून आला आहे.

शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनी पालकमंत्री व माजी आमदारांबद्दल खालच्या पातळीवर टीका केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले. शिवसेनेच्या आमदाराचा निषेध करण्यासाठी खालापूर खोपोली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पालीफाटा येथे 30 मे रोजी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.

या राष्ट्रवादीच्या निषेध कार्यक्रमाने शिवसेना आक्रमक झाली असून 31 मे रोजी पालीफाटा येथे शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी वर्गाने एकत्र येत आक्रमक पवित्रा घेत राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश लाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.

तर राज्यात महाविकास आघाडी असताना कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना – राष्ट्रवादीत बिघाडी झाल्याचे पाहायला मिळत असून ही आघाडीतील बिघाडी अशीच कायम राहिल्यास येत्या निवडणूकांमध्ये शिवसेना – राष्ट्रवादीतील संघर्ष वाढेल यात तिळमात्र शंका नाही. तसेच याप्रसंगी असंख्य शिवसेना – युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला वर्ग उपस्थित होता.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.