Press "Enter" to skip to content

कोविडसेंटरमधीलरूग्णांना आधार व दिलासा

कानसा वारणा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकदादा पाटील यांची कोविड सेंटरला भेट !

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

सध्या संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात कोरोना महामारीचे महाभयंकर संकट ओढावले आहे, गेल्या वर्षंभरात अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले.त्यातच सागरी वादळामुळे न भुतो न भविष्यती अशा स्वरुपाची प्रचंड आर्थिक व नैसर्गिक हानी होऊन जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले आहे. लहानथोरांना या संकटामुळे काही सुचेनासे झाले आहे. शासन आपल्या परीने नागरीकांमध्ये जनजागृती करून अथक उपाययोजना करत आहे.
नागरीकही आपापल्या परीने काळजी घेण्याचा प्रयत्न करुन कोरोनाशी चार हात दूर राहून आपला जीव वाचवून प्रपंचाचा गाडा हाकत आहेत.

लाॅकडाऊन कालात गरजू गोरगरीबांना काहीअंश दिलासा मिळावा यासाठी कानसा वारणा फाऊंडेशन कडून तूरूकवाडि कोविड सेंटरमध्ये
मास्क, सॅनिटायझर तसेच कोविड रूग्णाना बिस्किटचे वाटप करण्यात आले.यावेळी चौक वावर्ले येथील कानसा वारणा फाऊंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकदादा पाटील, तुरूकवाडी कोविड सेंटर मधील डाॕक्टर व सहकारी कर्मचारी तसेच कानसा वारणा फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.