सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील गोवे गावातील रहिवाशी पार्वती महादेव मुसळे यांचे दिर्घ आजारपणाने निधन झाले.त्या गेल्या दोन वर्षांपासून आजारी होत्या.मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षाचे होते. त्या अतिशय प्रेमळ व शांत स्वभावाने सर्वांना परिचित होत्या.
त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गोवे ग्रामस्त,भोई समाज बांधव,व इतर समाजातील नागरिक सोशल डिस्टन्सचा पालन करीत उपस्थित होते.त्या गोवे गावातील सामाजिक कार्यकर्ते महादेव रामजी मुसळे यांच्या पत्नी होत्या.त्यांच्या पश्चात त्यांचे पती, दोन मुलगे, दोन मुली,सुना, जावई,पुतणे,नातवंडे व मोठा मुसळे परिवार आहे.त्यांचे दशक्रियाविधी गुरुवार दि.३जून व उत्तर कार्य विधी रविवार दि.६ जून २०२१ रोजी त्यांच्या गोवे येथील निवासस्थानी होणार आहेत.








Be First to Comment