Press "Enter" to skip to content

रोहे येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अभिवादन

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३८ वी जयंती रोहे येथे अखिल भारतीय हिंदू महासभा रा.जि.शाखेच्या वतीने साजरी करण्यात येऊन शहरातील राममारूती चौकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

वाढत चाललेल्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर शासकीय कोरोना नियमावलीचे पालन करून सदरचा कार्यक्रम छोटेखाणी व साध्या पद्धतीने संपन्न करण्यात आला. यावेळी अ.भा.हिं.महासभेचे रा.जि.अध्यक्ष मधुकर खामकर यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पमालिका अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपाध्यक्ष शैलेश शिरकर,संघटक गणेश पवार, प्रशांत सुतार,दक्षिण रा.जि.उपाध्यक्ष गजेंद्र तुरंबाडकर,महिला अध्यक्षा भारती शहा,रोहे तालुका अध्यक्ष विलास धामणसे आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.