Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना संघर्ष टोकाला

कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध

आमदार महेंद्र थोरवे कोणाला म्हणाले मांजर ? सुरेश लाड यांच्यावर केले आरोप !

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

रायगड जिल्ह्यच्या पालकमंत्री आदीती तटकरे तसेच माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर कर्जत विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी बिनबुडाचे आरोप करत बेताल वक्तव्य केली याचा कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यकारीणीने जाहीर निषेध केला आहे.

गुरुवार दि.27 मे रोजी कर्जत येथे शासकीय इमारतीच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमाच्यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी पालकमंत्री आदीती तटकरे यांचे नाव न घेता मांजर आडवी गेल्याचा उल्लेख केला.तसेच माजी आमदार सुरेश लाड यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत बेताल वक्तव्य केली. स्त्रियांचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिकवणीचा विसर शिवसैनिक म्हणून घेणा-या आमदार महेंद्र थोरवे यांना झाल्याने त्यांनी पालकमंत्री आदीती तटकरे यांच्याबाबतीत असे खालच्या पातळीचे वक्तव्य केले.

राज्यात आघाडीचे सरकार आहे आणि या आघाडी पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींच्या निर्णयानुसार रायगड जिह्याचे पालकमंत्री पद हे आदीती तटकरे यांच्याकडे देण्यात आले. पालकमंत्री पद आज आहे उद्या नसेल असे व्यक्तव्य करून आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या वरिष्ठांच्या निर्णयाला एकप्रकारे आवाहन दिले आहे.

या बैठकीत कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून आमदार महेंद्र थोरवे यांचा निषेध केला.
यावेळी कर्जत तालुका महिलाध्यक्षा ॲड.रंजना धुळे, जिल्हा उपाध्यक्षा पुजा सुर्वे, कर्जत शहरध्यक्षा पुष्पा दगडे ,माजी महिलाध्यक्षा हिरा दुबे, नगरसेविका सुवर्णा निलधे, मधुरा चंदन, डॉ. ज्योती मेंगाळ, बोरिवली ग्रामपंचायत सरपंच वृषाली क्षीरसागर, टेंभरे ग्रामपंचायत सरपंच दीपाली पिंगळे, दामत ग्रामपंचायतीच्या उपसरपंच नयना आखाडे, बोरिवली ग्रामपंचायत सदस्या नेहा खडे आदी महिला उपस्थित होत्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.