सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।
कोरोना पहिला लाटेत होरपळून निघालेला खालापूर तालुका दुसऱ्या लाटेत हि कोरोना हॉटस्पॉट बनला आहे. कोरोना आटोक्यात यावा यासाठी सर्वपक्षीय एकत्र येत चांगल्या दर्जाचे कोव्हीड रुग्णालय उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. परंतु ह्या प्रयत्नाला राजकीय संसर्ग लागला आणि राष्ट्रवादी शिवसेनेत श्रेयवादावरून उफाळून आलेल्या वादात संभाव्य रुग्णालय व्काॅरंटाईन झाले आहे.
खालापूर तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या यामुळे सुसज्ज कोव्हीड रुग्णालय उभे करण्यासाठी प्रशासकीय आणि सर्व राजकीय पक्ष एकत्रित बैठक पार पडली होती. या बैठकीत कर्जत खालापूर चे आमदार महेंद्र थोरवे यांनी 50लाख निधी देण्याची घोषणा केली आणि ह्याच निधीवरून माशी शिंकली. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी तातडीने खालापूर दौरा करत संभाव्य कोव्हीड रुग्णालय सर्व सुरक्षिततेचे नियम पालन करून उभे राहत नसल्यास सुरू न करण्याचे आदेश दिले .आणि याच कारणावरून वादाला सुरुवात झाली.
ह्या वादाला कर्जत येथील प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचे निमित्त मिळाले आणि माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यायांच्यात ठिणगी पडली. खोपोली कोव्हीड रुग्णालय कोणाच्या आडमुठेपणामुळे होत नाही त्याची उघड चर्चा विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी सुरू केल्याने सर्वसामान्यांपर्यंत ह्या वादाची आणि सुरू असलेल्या राजकारणाची माहिती पोचली. या वादात स्पष्टीकरण देण्यासाठी खोपोलीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान नगराध्यक्षा सुमन औसरमल यांनी हे जे राजकीय चालले आहे हे शांतता पूर्वीचे वादळ आहे . लवकरच सिल्व्हर ओक आणि मातोश्री एकत्र बसून शांतता प्रस्थापित होईल आपण आपले हॉस्पिटल लवकरच कसे सुरु करता येईल याची तयारी करू आपल्याला सर्वांचे सहकार्य लाभेल यात काही हि शंका नाही .असा संदेश समाज माध्यमावर प्रसारित केल्याने रुग्णालयाच्या बाबतीत सुरू असलेल्या राजकीय संसर्गाची एक प्रकारे कबुली दिली आहे.
सर्वसामान्य जनता मात्र कंटाळली असून लवकरात लवकर कोव्हीड रुग्णालय सुरु करा, तुमचे राजकारण थांबवा असा टाहो फोडत आहे .विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी चार दिवसातच कोव्हीड रुग्णालय सुरू करतो असे आश्वासन खालापूर जनतेला दिले असून उपचारा अभावी धावाधाव करणाऱ्या कोरोना रुग्णाला या राजकीय संसर्गाची अधिक बाधा झाली आहे.
खासदार ,आमदार आले त्यानी देखील आमदार खासदार फंडातून लाखो रुपयाचा निधी देवुन वेगाने सेन्टर सुरु करू सांगितले. परंतु कोरोणा सेन्टर मात्र सुरू झाले नाही. शेकडोचे वर रूग्ण दगावले .परंतु सर्व पक्षीय बैठक घेवून पोकळ भाषणे ठोकली . खालापूर नागरिकांत दुर्दैव आहे आता तरी राजकारण थांबवून लवकर रूग्णालय सुरू करावे ही अपेक्षा.
पैहलवान जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंतराव ओव्हाळ







Be First to Comment