तक्रारींवर कारवाही नसल्याने नागरिक संतप्त
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
रोहा तालुक्यातील कोलाड विभागीय महावितरण उपभियंता यांच्या कडून ग्राहक वर्गाच्या तक्रारींना केराची टोपली कोलाड विद्युत पुरवठा कार्यालयात ग्राहक वर्गानी केलेल्या तक्रारींवर संबधित अधिकारी व सदरचे कर्मचारी कोणतीही कारवाही करत नसल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे ,
या बाबत सविस्तर माहिती अशी की विद्युत वितरण पुरवठा संदर्भात कोणताही कामाचा अर्ज केला तर त्याची पोहच मिळत नाहीच तर याशिवाय अर्ज करण्यासाठी गेलेल्या ग्राहकाला या ठिकाणी दोन तीन तास कार्यालयात ताटकळत बसावे लागते तर कार्यालयात एकही कर्मचारी वेळेवर उपस्थित नसल्याने ग्राहकांची मोठी कूचंबना होत असुन या कार्यालयाचा कारभार आहे तरी कसा असा प्रश्न ग्राहक वर्गातुन व्यक्त करत संताप व्यक्त केला जात आहे.
या बाबत तुकाराम नामदेव महाडिक यांनी थ्री फेज वायर सुरु करण्यासाठी अर्ज केला होता वारंवार तोंडी सांगून कोणताही परिणाम झाला नसल्यामुळे त्यांनी दिनांक ८ मे २०२१ रोजी लेखी अर्ज केला होता.त्याचा कोणताही जबाब त्यांना मिळाला नाही त्यानंतर त्यांनी २४ मे २०२१ रोजी पुन्हा अर्ज केला व त्याची पोच मागण्यासाठी ते कोलाड येथील कार्यालयात गुरुवार दि.२७ मे रोजी दुपारी १.३० वा गेले असता त्यांना सदरील या अर्जाची झेरॉक्स आणा मग तुम्हांला पोच देतो नंतर ग्राहक महाडिक यांनी ताबडतोब त्याची झेरॉक्स प्रत घेऊन आल्यानंतर या कार्यालयात कोणीच कर्मचारी नाही ते तब्बल तीन तासाहून अधिक काळ या ठिकाणी थांबले मात्र कोणीही आले नसल्याने ते रिकाम्या हाती परतले.
महाडिक यांच्या घरा शेजारून जाणारी विद्युत वाहिनी २०११ पासून थ्री फेज असणारी लाईन ही एक फेज केल्यामुळे त्यांच्या घरातील विद्युत पुरवठा कमी होत असल्याने कुलर,मिक्सर, फ्रिज, फॅन, व पाण्याचा पंप चालत नाही त्यामुळे तुकाराम महाडिक यांनी दोन वेळा ही लाईन थ्री फेज करण्यासाठी अर्ज केला होता त्या अर्जाची पूर्तता सोडाच त्याची पोच पावती देखील नाही थेट केराची टोपली परंतु या संदर्भात पुन्हा या तक्रारी बाबत विचारणा करण्यासाठी व पोच घेण्यासाठी या कार्यालयात २७ मे रोजी तुकाराम महाडिक यांचा मुलगा निलेश महाडिक हे गेले असता ते देखील तीन तासांहून अधिक वेळ बसले तरी सदरील अधिकारी अथवा कर्मचारी कोणी फिरकले नाही. असा सदररील कार्यालयाचा भोंगळ कारभार पाहताच कोलाड विभागीय शिवसैनिक निलेश महाडिक यांनी थेट यांची चौकशी व्हावी यासाठी आमदार महेंद्र दळवी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधत आशा या भोंगळ कारभार या विषयी तक्रार केली असल्याचे निलेश यांनी माहिती दिली ,
कोलाड विभागात एका वर्षां पासुन अनेक विविध कामे बाकी आहेत या विषयी वर्तमान पत्रातून बातम्या आल्या कि त्याची पाहणी केली जाते परंतु काम मात्र पुर्ण केले जात नसल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.









Be First to Comment