सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।
पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना अनेक राजकीय घडामोडी पाहण्यास मिळत असल्या तरी माथेरानच्या सौंदर्यात भर पडण्याच्या दृष्टीने माथेरान नगरपरीषदेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्या कारकिर्दीत अनेक विकासकामे मार्गी लागत आहे.
आशातच माथेरान गिरीस्थान नगरपरीषदेस शासनाच्या विविध योजना अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून व नगरपरीषद फंडातुन करण्यात येणाऱ्या तसेच पुर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण व भुमिपुजन सोहळा संपन्न झाला.
माथेरान पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्त्यांचा लोकार्पण तसेच विविध रहीवाशी भागांतील प्रस्तावित कामांचे भूमिपूजन सोहळा कोव्हीड -19 पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) सकाळी 11 वाजल्यापासून आयोजित करण्यात आला होता.यावेळी दस्तुरी नाका येथील नुतनीकरण कामासाठी सी.एन. लधानी इंटरप्रायजेस या कंपनीला या कामाचा ठेका ४९,४१३,५१.३०/- एवढ्या रक्कमेला देण्यात आला आहे. त्याचबरोबर नगरपरीषदेच्या हद्दीतील मुस्लिम स्मशान भूमीची कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी फायरविंग इन्फ्राकॉन सर्विसेस या कंपनीला ४,३४,५९७/-ठेका दिला आहे. तर माथेरान संत रोहिदास नगर येथील स्टेज नुतनीकरण कामासाठी फायरविंग इन्फ्राकॉन सर्विसेस या कंपनीला ११,३२,८१९/- एवढ्या रक्कमेला काम देण्यात आले असून ,संत रोहिदास नगर येथील अस्तित्वात असलेले दशक्रिया विधी शेडच्या पुणर्विकास कामासाठी फायरविंग इन्फ्राकॉन सर्विसेस या कंपनीला १९,३०,४७४/- रक्कमेला ठेका दिला असुन, पंचशील नगर येथील शिंगे यांच्या घराजवळील गटार बांधकामासाठी फायरविंग इन्फ्राकॉन सर्विसेस या कंपनीला २८,३४,२१८/- एवढ्या रक्कमेला ठेका देण्यात आला आहे. या कामाचे भुमिपुजन तसेच माथेरान मधील मलंग व हनिमून पॉईंट कडे जाणार्या रस्त्यांचा लोकार्पण सोहळा दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री मा.ना.श्री. एकनाथ शिंदे, रायगड जिल्हा पालकमंत्री मा.ना. अदितीताई तटकरे, माथेरान ब्रॅंड अॅम्बेसेडर आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग आप्पासाहेब बारणे, आमदार महेंद्र थोरवे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, गटनेते प्रसाद सावंत, तसेच आदि नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते .








Be First to Comment