सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
रसायनी पाताळगंगा परीसरात तसेच एम.आय.डी.सी.अतिरीक्त परिसरात अनेक कंपन्या सुरू आहेत.या कंपन्यात व कारखान्यांमध्ये दिवसाला हजारो वाहने दांडफाटा ते पाताळगंगा याच रस्त्यावरून ये-जा करत असतात.शिवाय काम करण्यासाठी कामगारांची तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांची दांडफाटा-पातालगंगा या रस्त्यावरुन रेलचेल सुरू असते.
यावेळी रात्रपाळीला जाताना तसेच दुसरी पाली करुन घरी परतत असताना पराडे काॅर्नंर ते दांडफाटा या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असते.अशावेली वाहन अपघाताची भीती नाकारता येत नाही.शिवाय चो-यांचे प्रकारही होवू शकतात. याअगोदर अशा काही घटना घडल्याही आहेत.तरी सुरक्षिततेचा प्रश्न डोळयासमोर ठेवून दांडफाटा-पातालगंगा रस्त्यावर पथदिवे बसविण्याची मागणी काॅग्रेस आयचे जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ मुंढे यांनी वरिष्ठांसह एमआयडीसीकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.








Be First to Comment