Press "Enter" to skip to content

सेवा सोशल सर्विस सोसायटी तर्फे खरसुंडी येथे सुरक्षा किट वाटप

शेकडो हून अधिक महिलांना घरोघरी किट घरपोच

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

सेवा सोशल सर्विस सोसायटी यांच्या माध्यमातून कोरोना च्या पाश्वभुमी वर नागरिकांची सुरक्षा घ्यावी या उद्देशाने खरसुंडी येथे असलेली सेंट मेरी स्कूल मध्ये सुरक्षा किट वाटप करण्यात आले.मात्र कोरोना मुळे हे किट घरोघरी जावून अदिवासी बांधवांना शेकडोहून अधिक वाटप करण्यात आले.यामध्ये मास्क, साबण, स्टेपी फ्री ( पॅड )ब्लीचिंग पावडर सॅनिटायजर अदि वस्तू वाटप करण्यात आले.

सेवा सोशल सर्विस सोसायटी यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असतांना सामजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे ही संस्था आदिवासी महिला वर्गांसाठी विविध उपक्रम राबविण्यात सातत्याने पुढाकार घेत असते.
यावेळी सेवा सोशल सर्विस सोसायटी इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सेंट मेरी स्कूल – खरसुंडी बिशप, एफ. आर. संतोष यांच्या हस्ते स्वच्छ्ता किटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रकल्प समन्वयक- मंगेश भंडारे, सहकारी जगदीश चाळके, कांचन सावंत, वासंती धांदृत आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.