सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।
खरीप हंगामसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर यांचेमार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी मा.किसनराव मुळे – संचालक आत्मा म. रा. यांनी भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या अंतर्गत ताकई येथील प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांचे अन्वय अन्न योजना ( PM FME ) अंतर्गत डाळ मिल प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्प विस्तारीकरणाबाबत चर्चा व मार्गदर्शन केले.
तसेच महड येथील प्रगतशील शेतकरी कोशे यांचे प्रक्षेत्रावर यांत्रिक पद्धतीने भात लागवड तंत्रज्ञानाची माहिती घेऊन सदर तंत्रज्ञानाचे फायदे व मजुरांची टंचाई लक्षात घेता तालुक्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भात लागवड करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले.
त्याच प्रमाणे तालुक्यात कृषी विभागामार्फत स्थापन झालेल्या सुखकर्ता ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, वावंढळ येथील टिश्यूकल्चर तंत्रज्ञानाने लागवड केलेल्या केळी प्रक्षेत्रास तसेच फळ पिकवण कक्षास भेट देऊन कंपनीचे प्रवर्तक सुभाष मुंढे, दिनेश शिंदे यांच्याशी पुढील वाटचालीबाबत चर्चा केली याच वेळी परिसरातील मोहन धोंडू दळवी यांचे मनरेगा अंतर्गत आंबा लागवड प्रक्षेत्राची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.
दत्तात्रेय चिंधु मते गाव-पोयंजे यांनी अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेतून भाजीपाला रोपवाटिका स्थापन केलेली आहे, सदर लाभार्थ्यास मा.संचालक(आत्मा) यांनी रोपवाटिका विक्री परवाना लवकरात लवकर घेऊन भाजीपाला रोपे विक्रीचे काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या.
मौजे- कसळखंड येथील राजेंद्र शांताराम घाडीगांवकर यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना (PMFME) अंतर्गत काजू प्रक्रिया युनीट बळकटीकरणसाठी अर्ज केलेला आहे, काजू प्रक्रिया युनिटला भेट देऊन युनीट बळकटीकरणबाबत चर्चा व मार्गदर्शन केले. या सर्व प्रकल्पांसाठी वेळोवेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड उज्वला बाणखेले यांचे चांगले मार्गदर्शन मिळत असलेबाबत भेटीदरम्यान शेतकरी यांनी संचालक आत्मा यांना सांगितले.
प्रत्येक्ष भेटी दरम्यान मा.संचालक आत्मा महाराष्ट्र राज्य पुणे यांचे समवेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अलिबाग कार्यालयातील सतीश बोऱ्हाडे, .(प्रकल्प उपसंचालक आत्मा) सिताराम कोलते (प्रकल्प उपसंचालक, आत्मा) दत्तात्रय काळभोर (कृषी उपसंचालक रायगड) , तालुका कृषी अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी,खोपोली अर्चना सुळ – नारनवर, प्र.तालुका कृषी अधिकारी पनवेल श्री.रविंद्र पाचपुते, मंडळ कृषी अधिकारी श्री एम. ए. सालके तसेच कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, आत्मा बीटीएम हे उपस्थित होते.








Be First to Comment