Press "Enter" to skip to content

रोहे तालुक्यातील देवकान्हे येथील आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न मार्गी

देवकान्हे आरोग्य उपकेंद्र येथील जनतेच्या आरोग्याच्या द्रुष्टीने फारच फायद्याचे ठरेल : बाबूराव बामणे

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे तालुक्यातील देवकान्हे येथील आरोग्य उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागल्याने आमच्या विभागातील जनतेचे आरोग्याच्या द्रुष्टीने फारच फायद्याचे होणार असल्याची प्रतिक्रिया रोहे पं.समितीचे माजी उपसभापती तथा जेष्ठ नेते बाबूराव बामणे यांनी याबाबत अधिक माहिती देताना पत्रकारांना सांगितले आहे.

याबाबत पत्रकारांना अधिक माहिती देताना माजी उपसभापती बाबूराव बामणे यांनी येथे आरोग्य उपकेंद्र व्हावे यासाठी २०१३ पासून देवकान्हे ग्रामस्थ व विभागातील नागरिकांनी संबंधितांना वेळोवेळी अर्ज व निवेदन देऊन या मागणीचा पाठपुरावा केला तर उपकेंद्राचे बांधकामासाठी जागा मिळावी यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणीही केली होती.ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याने अखेर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्तिश: लक्ष घालून संबंधितांना याबाबतची कार्यवाही पुर्ण करण्यासाठी योग्य निर्देश दिल्याने आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचा प्रश्नही मार्गी लागला असून लवकरच येथे सुसज्ज अशी आरोग्य उपकेद्राची इमारत उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी याकामी केलेल्या मोलाचे सहकार्य केल्याने आम्ही समस्त देवकान्हे ग्रामस्थ व विभागातील ग्रामस्थ त्यांचे शतशः ऋण व्यक्त करीत असल्याचे सांगिगले.

आमचा विभाग हा ग्रामीण विभाग असल्याने येथील बहुतांश रहिवासी वर्गाचा व्यवसाय हा शेतीशी संबंधित असल्याने व आमची गावे ही डोंगराच्या पायथ्याशी वसलेली असल्याने ब-याचवेळा शेताभातावर,जंगलभागात काम करीत असताना व रात्री-अपरात्री साप व विंचू दंशाच्या घटना घडत असतात,अशावेळी उपचारासाठी फार मोठी धावपळ करावी लागते.परंतु आता येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर झाल्याने आमच्या देवकान्हे व तळवली ग्रा.पं.हद्दीतील रहिवासी वर्गाची याबाबत होणारी परवड आता थांबणार असून आरोग्य उपकेंद्र जनतेच्या आरोग्याच्या द्रुष्टीने फार मोठे फायदेशीर ठरणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.