Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र थोरवे यांची कर्जत नगरपरिषदेला भेट

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

कर्जत नगरपरिषदेस आमदार महेंद्र थोरवे यांनी भेट दिली, यावेळी त्यांनी नगराध्यक्षा, नगरसेवक, कर्मचारी यांची बैठक घेतली व विकास कामांबाबत चर्चा केली.

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आमदार महेंद्र थोरवे यांचे स्वागत केले. त्यानंतर आमदार थोरवे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले.कर्जत शहरात प्रवेशद्वार तसेच शिवसृष्टी, गार्डन, प्रति आळंदी, शहरातील रस्ते यासाठी 7 कोटी रुपयांचा विकास निधि आमदार महेंद्र थोरवे यांच्या मध्यामतून प्राप्त झाला आहे, या कामांना लवकरच सुरवात होणार असून त्याची पाहणी केली.

याप्रसंगी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील, उपजिल्हा प्रमुख भाऊ गायकर, भरत भगत, कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, गटनेते नितीन सावंत, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींबकर, नगरसेविका स्वामींनी मांजरे, संचिता पाटील, वैशाली मोरे, नगरसेवक विवेक दांडेकर, बळवंत घुमरे, संकेत भासे, पंकज पाटील,अभियंता मनीष गायकवाड, आर्किटेक्ट राहुल आगज यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.