Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी प्रा.एल.बी पाटील

सिटी बेल । उरण । विठ्ठल ममताबादे ।

महाराष्ट्र शासनाच्या मराठी विभागाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी ज्येष्ठ साहित्यिक, रायगड भूषण प्रा. एल.बी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. एल.बी. पाटील यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर तीन वर्षाच्या कालावधीसाठी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. एल.बी पाटील यांची आतापर्यंत चौतीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत.काव्य, नाट्य, कादंबरी ,कथा अशा साहित्यावर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. प्रा. एल .बी पाटील हे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे तीन वर्षे त्यांनी कार्याध्यक्ष पद भूषवले आहे.
जेष्ठ साहित्यिक प्रा. एल.बी पाटील हे मनमिळावू व सर्वांना सोबत घेऊन जाणारे, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व असून प्राध्यापक एल.बी पाटील यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.