Press "Enter" to skip to content

वडखळच्या सरपंचावरील अविश्वास ठराव जनतेने नाकारला

गुप्त मतदानातून सरपंच राजेश मोकल 8 मतांनी विजयी

सिटी बेल । पेण । वार्ताहर

पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल यांच्याविरुद्धात 13 विद्यमान सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. या अविश्वास ठराव प्रस्तावाच्या अनुषंगाने प्रशासनाने वडखळ ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेचे व गुप्त मतदान 27 मे 2021 रोजी जय किसान विद्या मंदिर वडखळ येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये वडखळच्या मतदार राज्याने हा अविश्वास ठराव असहमत केला असून पुन्हा सरपंच राजेश मोकल यांना 8 मतांनी विजयी केले आहे.

वडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी थेट निवडून आलेले सरपंच राजेश मोकल यांच्यावर अडीच वर्षांनी 13 सदस्यांनी अविश्वास ठराव पास केल्यामुळे 15 सदस्यांमधून 13 सदस्य सरपंच यांच्याविरोधात गेले असल्याने प्रशासनाने घेतलेल्या ग्रामसभेत व गुप्त मतदानात ग्रामपंचायत हद्दीतील 2181 मतदारांनी गुप्त मतदान केले असता रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या मतमोजणीत सरपंच राजेश मोकल 8 मतांनी विजयी झाल्याचे निवडणुक अध्यासीय अधिकारी तथा नायब तहसीलदार धनंजय कांबळे यांनी जाहीर केले.

वडखळच्या विशेष ग्रामसभेत गुप्त मतदान घेण्यात आले.यात एकूण 2181 मतदारांनी आपला हक्क बजावला असल्याने अविश्वास ठरावाच्या बाजूने 1070 मते तर अविश्वास ठरावाच्या विरोधात 1078 मते पडली त्यामध्ये 33 मते बाद झाली असता सरपंच राजेश मोकल हे 8 मतांनी विजयी झाले.
यावेळी बोलतांना सरपंच राजेश मोकल म्हणाले की वडखळच्या जनतेने मला पुन्हा कौल दिला असून यापुढे वडखळचा विकास हाच आपला ध्यास असणार आहे हा विजय माझा नसून जनतेचा आहे.आपल्या आर्शिवादाने जनतेची सेवा करण्याची संधी मला पुन्हा मिळाल्याने जनतेचे आभार त्यांनी यावेळी मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.