जबाबदारी ची जाण असणारा अधिकारी असल्यास प्रगतीचा आलेख उंचावतो – रायगड पोलीस अधिक्षक
सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।
कर्त्यव्यनिष्ठ व जबाबदारीची जाण असणारे अधिकारी आपल्या परिसरात असल्यास परिसरात प्रगतीचा आलेख उंचावतो,अनिल विभूते यांच्या कारकिर्दीत खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शंभर सीसीटीव्ही लागतील याची खात्री आहे, असे उदगार रायगड चे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी काढले.
खालापूर पोलीस, खालापूर नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने व लोकसहभागातून खालापूर फाटा,सावरोली नाका व बीड-जामरूंग फाट्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत, त्याचा उदघाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रम रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याहस्ते खालापूर पोलीस ठाण्यात झाला,त्याप्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, खालापूर पोलीस निरीक्षक हे विविध प्रकारचे उपक्रम राबवत असून त्यामुळे पोलीस व पोलीस पाटील यांची खरी ओळख जनतेत निर्माण झाली आहे, आता सीसीटीव्ही कॅमेरे हे शोधकार्याचा आत्मा झाले आहेत,पोलीस यांना सहकार्य करण्यासाठी दुकानदार, घर व बंगले मालक यांनी आपल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.खालापूर चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी आपल्या प्रस्ताविक मध्ये येथील दानशूर,जनतेचे,पत्रकार व सहकारी यांच्या सहकार्यानेच शक्य झाल्याचे सांगितले.यावेळी उद्योगपती प्रीतम म्हात्रे,नितीन देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.महड चे पोलीस पाटील यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ला, खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार,खालापूर नगरपंचायत मुख्य अधिकारी सपोनि संजय बांगर,लव्हे, संतोष जंगम,शिवानी जंगम,पोलीस पाटील अनंत ठोंबरे, तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीशसर मरागजे यांनी केले तर आभारप्रदर्शन सपोनि संजय बांगर यांनी केले.








Be First to Comment