Press "Enter" to skip to content

छावा क्रांतिवीर सेना जिल्हाध्यक्षपदी सुनील पाटील यांची निवड

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले महाराज यांच्या नावाने व आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात छावा क्रांतिवीर सेना कार्यरत आहे. सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्रात काम करणारी संघटना व अन्यायाविरुद्ध लढणारी गोरगरीब जनतेच्या न्याय मिळवून देणारी तसेच बारा बलुतेदारांना सोबत घेऊन जाणारी ही संघटना मोठ्या जोमाने महाराष्ट्रभर कार्यरत आहे.
पत्रकार सुनील पाटील भाताण यांची छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य रजिस्टर नंबर ११४९/२०१६ रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.त्यांना केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील यांच्याहस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

नागरिकांच्या न्यायहक्कासाठी अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच संघटनेमधील सर्व पदाधिकारी यांना सोबत घेऊन जनहितासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे यावेळी सुनील पाटील यांनी बोलताना सांगितले .
यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख विजय (बंड्या) ठोसर, कार्याध्यक्ष म्हणून नितीन पाटील, उपाध्यक्ष संकेत भोईर, सचिव राजेश दरेकर, उपाध्यक्ष कमलाकर बोराडे, उपाध्यक्ष रजनीकांत पावली ,खजिनदार सुमित जाधव ,सहसचिव चंद्रकांत गावंडे, सदस्य संतोष पाटिल ,रायगड जिल्हा कार्यकारणी जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले.तसेच यावेळी पनवेल जिल्हा कार्यकारिणीची देखील निवड करण्यात आली.यामध्ये पनवेल जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रसाद परब यांची निवड करण्यात आली.

यावेळी केंद्रीय अध्यक्ष प्रतापसिंह कांचन पाटील , महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील , पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गोपाळ घारे , कोकण विभागीय कार्याध्यक्ष धनंजय घरत. ज्येष्ठ पत्रकार रायगड जिल्हा कार्यकारिणीचे मार्गदर्शक देविदास गायकवाड पनवेल तालुका अध्यक्ष अनिकेत पाटील उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.