सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।
रोहे तालुक्यातील देवकान्हे-पिंपळवाडी गावचे रहिवासी असणारे बळीराम गोविंद शेडगे यांचे राहत्या घरी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.त्या समयी ते ६० वर्षांचे होते.
अतिशय विनम्र, शांत व प्रेमळ स्वभावाचे बळीराम शेडगे यांच्या निधनाने शेडगे परिवारातून व ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. सध्याच्या कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर शासकीय कोरोना नियमावलीचे पालन करून त्यांचे अंत्यविधी पार पाडण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार भाऊ,एक बहिण, एक मुलगा,एक मुलगी,सुन,जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी बुध.दि.२ जून तर अंतिम धार्मिकविधी ४ जून रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment