Press "Enter" to skip to content

कोरोना काळात ग्रामीण भागातील नागरिक विविध कामात व्यस्त

वेळेचा करीत आहेत सदुपयोग

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र व राज्य सरकारने लाँकडाऊनचा कालावधी वाढविला असल्याने या फावल्या वेळेचा सदुपयोग म्हणून ग्रामीण भागातील शेतकरी व पगारदार वर्ग तसेच महिलावर्ग विविध कामात व्यस्त असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरुन दिसून येत आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा एकदा कोरोनाने हळूहळू डोके वर काढल्याने सर्वांच्याच चिंतेत पुन्हा ऊकदा भर पडली.तर यावर जालिम उपाय म्हणून शासनाने हळूहळू लाँकडाऊन प्रक्रियेला सुरूवात केली.लाँकडाऊन पुकारल्याने व अत्यावश्यक सेवा पुरविणा-यांना या कालावधीत सुट दिली असल्याने बहुतांश व्यवहार हे जवळ जवळ ठप्पच झाले आहेत.अशावेळी आपल्या फावल्या वेळेचे करायचे हा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला असतानाच ग्रामीण भागातील शेतकरी व अन्य नागरिकांनी शेतीच्या कामाला प्रथम प्राधान्य देऊन आपल्या वेळेचा जास्तीत जास्त सदुपयोग कसा करायचा याबाबत नियोजन करुन कामाची आखणी केली आहे.

त्या अनुषंगाने कोरोनामुळे उद्धभवलेली परिस्थिती लक्षात घेता अति महत्त्वाचे कामाव्यतिरिक्त सहसा कोणीही बाहेर पडताना दिसत नाही.अशावेळी ग्रामीण भागातील पुरुष व महिला आपापल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.महिलावर्ग तांदूळ,पोहे व उडदाचे पापड करणे,तांदळ व साबुदाण्याच्या फेण्या,तांदळाच्या शेवया,कडधान्ये सुकविणे आदी कामात तर शेतकरी व अन्य नोकरदारवर्ग शेतीची बांधबंदीस्ती, घरांचे बांधकाम व दुरुस्ती तसेच जंगल भागातून सरपण गोळा करणे आदी व्यस्त आहेत.ही सर्व कामे करताना सुरक्षितता म्हणुन बाहेरील माणसे मदतीला घेतली तर सोशल डिस्टन्सिंगचे पालनही करताना दिसत आहेत.तर या सर्व कामात घरातील लहान मुले मुली व वयोवृद्ध मंडळींचे सहकार्य लाभत असल्याचे पहावयास मिळत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असतानाच शासनाचे या आदेशांचे सर्वत्र पालन करून देशवासीय देखील कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपल्या परीने शासनाला सहकार्य करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.