सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
बुधवारी अवकाशात सुपरमून व चंद्रग्रहण अश्या दोन खगोलीय घटना पाहायला मिळाल्या. या दिवशी चंद्र पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५७ हजार ३११ किलोमीटर अंतरावर आला होता. या दिवशीचे चंद्रबिंब नेहमीपेक्षा मोठे म्हणजेच १४ टक्के मोठे व ३० टक्के अधिक तेजस्वी दिसले.
बुधवारी संध्याकाळी ढगाळ वातावरण असल्याने भारतातून अंशतः दिसणारे चंद्रग्रहण पाहता आले नाही पण काही वेळानंतर आकाश निरभ्र झाल्यावरती संपूर्ण रात्रभर सुपरमून पहायला मिळाला, अशी माहिती ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनोमी अँड रिसर्च सेंटर चे अध्यक्ष व खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी दिली.
कसा पाहिला सुपरमून ?
सुपरमून पाहण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता न्हवती. पण दुर्बीण व टेलिस्कोप उपलब्ध असल्यामुळे सुपरमून चे नयनरम्य दृश्य पाहता आले व मोबाईल कॅमेऱ्यामध्ये चंद्राचा फोटोही काढता आले, यातीलच हा एक फोटो. तसेच अनेक खगोलप्रेमींनी जसे शक्य असेल तसे अंगणातून, बाल्कनी, टेरेस तसेच मैदानावरून चंद्राचा आकाराने व प्रकाशाने तेजस्वी नजरा पाहाण्याचा आनंद लुटला. हा सुपरमून या वर्षीचा दुसरा व शेवटचा सुपरमून होता.
जगभरातील खगोलप्रेमींना या दिवशी रेड ब्लड सुपरमून व चंद्रग्रहणाचे नयनरम्य दृश्य अनुभवले. अवकाशात अश्या अनेक घटना घडत असतात, त्यादेखील सर्वानी पहाव्यात व निसर्गाच्या रचनेचा उलगडा करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन खगोलशास्त्रज्ञ विशाल कुंभारे यांनी केले.








Be First to Comment