सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
भिरा फाटा सुतारवाडी मार्गाच्या दुरुस्तीचे काम यावर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याने वेळीच रत्याची दखल घेतल्याने प्रवाशांचा खड्डेमय प्रवास आता काही दिवस तरी सुखकर होणार असल्याने प्रवाशांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
भिरा फाट्यापासून पुढे सुतारवाडी मार्गे हे काम विळे पर्यंत होणार असल्यामुळे प्रवाशांचा खडतर प्रवास सुखकर होणार आहे. पंधरा दिवसांपूर्वी भिरा फाटा पासून पुढे सुतारवाडी मार्गे साईड पट्टी चे काम वेगाने सुरू केले. त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी खड्डे होते त्या त्या ठिकाणी आता त्याचे दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. दरवर्षी कोलाड पासून सुतारवाडी विळे पर्यंत लहान मोठे खड्डे पावसाळ्यात उग्र रूप धारण करत होते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचायचे त्यामुळे वाहन चालकाच्या लक्षात न आल्यामुळे अनेक वेळा अपघातही झाले आहेत.
भिरा फाटा ते विळे पर्यंत दुचाकी तसेच रिक्षांना चालकांना प्रवास करताना मोठ्या अडथळ्यातून मार्ग काढावा लागत होता. प्रवाशांची हाडे खिळखिळी होत असे. वाहनांची आदळ आपट व्हायची. रस्त्यातील खड्डे चुकवताना अनेक वेळा वाहनांची समोरासमोर ठोक्कर लागलेले आहे. रस्ता सुस्थितीत होत असल्यामुळे प्रवासी आणि वाहन सुरक्षितपणे प्रवास करू शकतील. सुतारवाडी मार्गे पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे प्रवासी याच मार्गाचा अवलंब करून पुणे, सातारा, सांगली, मिरज तसेच अन्य मार्गाकडे सातत्याने जात असतात. सुतारवाडी मार्गे पुणे केवळ ११५ कि.मी अंतर असल्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या लहान मोठ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमानावर आहे. सुतारवाडी पासून १२ किमी अंतरावर विळे-भागाड एम.आय.डि.सी आहे. या ठिकाणी नामवंत कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कच्चामाल नेणे आणणे यासाठी अवजड वाहनांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. भिरा फाटा ते विळे पर्यंत सुस्थितीत होणाऱ्या रस्त्याच्या साईट पट्ट्या तसेच रस्ता यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.








Be First to Comment