Press "Enter" to skip to content

पेण तालुक्यात बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

सिटी बेल । पेण । वार्ताहर ।

विश्व शांतीचे प्रतीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची 2565 वी बुध्द जयंती पेण तालुक्यातील विविध ठिकाणच्या बुध्द विहारात उत्साहात साजरी करण्यात आली.

जगावर कोरोना महामारीचे संकट असल्याने संपूर्ण जग याचा सामना मागिल दोन वर्षांपासून करीत आहे.त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने लाॅकडाऊन केले असून निर्बंध जारी केले आहेत.मात्र शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून तालुक्यातील अंतोरे बुद्ध विहारात लहान मुलांनी सकाळी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्धवंदना, पुजा पाठ घेऊन नविन आर्दश डोळ्यासमोर ठेवला आहे.

यावेळी मुलांनी तोंडाला मास्क, सॅनिटायझर तसेच सोशल डिस्टन्सचेंही पालन केले.शहरातील बुद्ध विहारासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी हमरापूर, दुष्मी, कुरनाड, पाबळ, शिव बेणसे येथील गावांमध्ये तर काही नागरीकांनी आपल्या घरी सुद्धा बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.