सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
सुकेळी (ता. रोहा ) येथील रहिवासी श्रीमती धोंडीबाई नथुराम खाडे (वय- ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सुकेळी येथील वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुकेळी येथील महामार्गालगत असलेल्या हाॅटेल आशिर्वादचे मालक संतोषशेठ खाडे यांच्या त्या मातोश्री होत. कै. धोंडीबाई खाडे यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा मोठा मित्र परिवार आहे.
कै. धोंडीबाई खाडे या अतिशय शांत व विनम्र स्वभावाच्या होत्या. सुकेळी गावामध्ये त्यांचे लहान ते थोरांपर्यंत चांगल्या पद्धतीत संबंध होते. त्या सर्वांसोबत मिळुन मिसळुन राहायच्या. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतुन गावातील प्रत्येक घरातील सर्वच कार्यक्रमात त्यांचा नेहमीच सक्रीय सहभागी असायच्या. पंरतु काही दिवसांच्या अल्पशा आजाराने धोंडीबाई खाडे यांची तब्येत खालावत गेली. अखेर त्यांची शनिवार (22 मे) रोजी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत माळवली. सुकेळी येथे महामार्गलगत असलेल्या सुप्रसिद्ध हाँटेल आशिर्वादचे मालक संतोषशेठ खाडे यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांचा जाण्याने संपुर्ण खाडे परिवारावर दुख:चे सावट पसरले आहे. कै. धोंडीबाई खाडे यांचे दशक्रिया विधी सोमवार दि. ३१ मे रोजी तर उत्तरकार्य गुरुवार दि. ३ जुन रोजी सुकेळी येथेच होणार असल्याचे संतोष खाडे यांनी सांगितले.








Be First to Comment