Press "Enter" to skip to content

सकल मराठा महासंघ प्रचार कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष घरटकर

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।

सकल मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अमर वाघ व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आनंद सरवणकर यांच्या मार्गदर्शनानुसार सकल मराठा महासंघाच्या प्रचार कोकण विभागीय अध्यक्षपदी महाड येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष घरटकर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार संतोष घरटकर यांचे सकल मराठा महासंघाचे कोकण विभाग अध्यक्ष महेंद्र धामणसे, रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज धामणसे, क्रीडा जिल्हा अध्यक्ष विनोद उतेकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पार्टे, तालुका नियोजन समिती अध्यक्ष शिवाजी दरेकर, रायगड जिल्हा रोजगार समिती अध्यक्ष चेतन पालांडे व कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.