सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर मधील ओ डी आर 23 ते चिंचवली – सालवड – नसरापूर रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे या कामाचे भूमिपूजन आज दि.27 मे रोजी मौजे नसरापूर संपन्न झाले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार घालण्यात आला. ओ डी आर 23 ते चिंचवली – सालवड – नसरापूर रस्त्याची लांबी 3.200 की. मीटर आहे, रस्त्यासाठी 1 कोटी 89 लाख 33 हजार इतका निधी मंजूर झाला आहे. रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, कर्जत विधानसंघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, उपतालुका प्रमुख बाबू घारे, युवासेना सचिव अॅड.संपत हडप, उपतालुका अधिकारी प्रसाद थोरवे, प्रभाकर भोसले, ग्रामपंचायत सरपंच साक्षी मोहिते,तसेच सर्व सदस्य आणि ग्रामपंचायत मधील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.








Be First to Comment