सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी रोहे तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांनी बनविलेल्या आँनलाईन स्टडी पँटर्नचे उद्घाटन तालुका पं.समिती येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चालू शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तालुक्यातील तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षकांनी एकत्र येऊन सदर अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे
कोरोना काळात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर्गाचे हित लक्षात घेऊन इ.१ ली ते ७ वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित सदर स्टडी पँटर्नची सुरूवात करण्यात आली असून अभ्यासक्रमात कविता, गोष्टी, संवाद, इतिहासातील प्रसंग,गणितीय क्रिया,कला, कार्यानुभव,शा.शिक्षण आदी विषयांवर सोप्या पद्धतीने अभ्यासक्रम तयार करून पीडीएफच्या माध्यमातून विद्यार्थी वर्गाला संबोधित केले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात जुलै ते आगस्ट पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित साहित्य तयार केले असून त्याचे उद्घाटन गट विकास अधिकारी जयेंद्र जाधव, सहायक गट विकास अधिकारी पंडीत राठोड,गट विकास अधिकारी साधुराम बांगारे,जिल्हा क्रीडा व शिक्षण समिती सदस्य अजय कापसे, केंद्र प्रमुख नारायण गायकर, संतोष यादव यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक अरूण घाग,जयेश भोईर,अमिता बामणे,रुपाली कापसे, वैशाली खराडे,वर्षाराणी मुंगसे,सौ.गुरव,श्रीम.सोनल पाटील, अंजना बिराजे यांनी साहित्याची निर्मिती केली असून तंत्रस्नेही शिक्षक अल्ताफ शेख व नंदकुमार तेलंगे यांनी सुंदर अभ्यासक्रम तयार केला आहे.
तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांनी तयार केलेल्या या अभ्यासक्रमाबद्दल पं.स.सभापती गुलाब वाघमारे व उपसभापती रामचंद्र सकपाल यांनी शिक्षकांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त करून विशेष कौतूक केले आहेत. तर या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थी वर्गाला घरबसल्या ज्ञानार्जनासाठी नक्किच होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Be First to Comment