Press "Enter" to skip to content

रखरखत्या उन्हात रोहे-कोलाड मार्गावर गुलमोहोर फुलले

प्रवासी वर्गाचे सहज वेधत आहेत लक्ष

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे ।

रोहे-कोलाड मार्गावर ठिकठिकाणी गुलमोहोरांच्या झाडांना लालसर रंगाची फुले येऊन ती फुलल्याने मार्गक्रमण करणा-या वाटसरूंचे सहज लक्ष वेधून घेत आहेत.याशिवाय रखरखत्या उन्हात या मार्गाचे सौंदर्यातही अधिक भर पडली आहे.
 

सध्या वैशाख वणव्याने सारेच होरपळून निघत आहेत. अशातच ब-याचशा वृक्षांची पाने गळल्याने वनराई उघडी बोडकी दिसत आहे.अशातच मार्गावर ठिकठिकाणी गुलमोहोर फुलल्याने सा-यांचेच लक्ष वेधत आहेत.तर या
मोसमात लक्ष वेधून घेणारी गुलमोहोराची फूले फुलल्याने सर्वांच्याच आकर्षणाचा विषय असतो.

साधारणतः एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा काहीवेळेस मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात  गुलमोहर लालसर रंगाने बहरण्याचा कालावधी असतो.यावर्षी मात्र उशिराच बहर आल्याने अखेर पर्यावरणप्रेमी नागरिकांचेही समाधान झाले आहे.या झाडांना लालसडक रंगाची फूले येत असल्याने झाडाचेही सौंदर्य खुलून दिसते व येणा-या जाणा-यांचे सहज लक्ष वेधून घेते.  
 

एकंदरीत या मार्गावर ठिकठिकाणी लागवड करण्यात आलेले गुलमोहर फुलल्याने व त्यांचा आलेला बहर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत याशिवाय आकर्षणाचा विषयही झाला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.