सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन ।
मुरुड तालुकयातील नांदगाव समुद्र किनारी एक जखमी समुद्री कासव नांदगाच्या माऊली मेडिकलचे मालक शैलेश दिवेकर यांना आढळून आले.सदरचे कासव जखमी अवस्थेत होते.त्यांच्या तोंडाला जखम झाल्याने कासव घायाळ अवस्थेत किनाऱ्याला आले होते.त्याच्या हालचालीही मंदावल्या होत्या दिवेकरांसह ,येथील स्थानिक लोकांनी त्या कासवाला खोल समुद्रात नेण्याचा दोन तीनवेळा प्रयत्न केला परंतु कासव जखमी असल्याने ते सारखे किनाऱ्याला येत होते.
शैलेश दिवेकर यांनी जखमी कासवा बाबत मुरुड वन खात्याला माहिती दिली.वन खात्याने सर्प मित्र व वन्यजीव प्रेमी संदीप घरत याना पाचारण करून थेट नांदगाव समुद्र किनारा गाठला व जखमी कासवाची पहाणी केली असता त्याच्या तोंडाला जखम झाल्याचे निदर्शनास आले.
वन खात्यामधील कर्मचारी व संदीप घरत यांनी सदर जखमी कासवाला पशु वैद्यकीय रुग्णालयात आणले.तेथील डॉक्टर विनायक पवार यांनी या कासवाची पहाणी करून त्याच्यावर योग्य ते औषधोपचार केले.
कासवावर उपचार होताच त्याला हायसे वाटून त्याच्यामधील चेतना जागृत झाली.तद्नंतर या कासवाला आगरदांडा येथील खोल समुद्रात सोडण्यात आले आहे.








Be First to Comment