रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून केला जाहीर निषेध
सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रोहा येथे शेतकरी विरोधी केन्द्र सरकारचा जहीर निषेध करण्यात आला. यावेळी रोहा नगर परिषदेच्यासमोर आंदोलन करण्यात आले, केन्द्र सरकारचा, नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध व्यक्त करत घोषणाबाजी करण्यात आली.
केन्द्र सरकारने गॅस, पेट्रोलची दरवाढ करून शेतकऱ्यांचे,सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, या दरवाढीच्या विरोधात जाहीर आंदोलन करत सरकाचा निषेध व्यक्त करण्यात आला, रोहा नगर परिषदेच्या समोर निषेध व्यक्त करून तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले, नायब तहसिलदार निलम दत्तात्रय ढोरजकर यांनी निवेदन स्वीकारले, कोरोनाच्या नियमांचे पालन करत मधुकर पाटील, विनोद भाऊ पाशिलकर, प्रीतम पाटिल, प्राजक्ता चव्हाण, अमीत ऊकडे , संजय पाटील यांनी निवेदन सादर केले,
केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलनात विनोदभाऊ पाशिलकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रस पार्टी, मधुकर पाटील, कार्याध्यक्ष रायगड जिल्हा,विजयराव मोरे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश, अमीत उकडे शहर अध्यक्ष, रामचन्द्र सकपाळ पंचायत समिती सभापती, उपसरपंच अमीत मोहिते, सतीश भगत, घनशाम कराळे, महेश कोलटकर उपनगराध्यक्ष ,महेन्द्र गुजर, महेंद्र दिवेकर, अनंत देशमुख, महेंद्र पोटफोडे, राजू पोकले ,ज्ञानेश्वर साळुंके, दत्ता चव्हाण , सतेज आपनकर, नितीन मालुसरे, नीलेश शिर्के, विनित वाकडे , नरेश पाटील ,प्रीतम पाटिल महिला अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्राजक्ता चव्हाण, यासह अनेक कार्यकर्ते, मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी रोहा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक नामदेव बंडगर, यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.








Be First to Comment