Press "Enter" to skip to content

खेड्यातील कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर

पावसळ्यापुर्वी घराची दुरुस्ती करण्यांची लगबग

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।
पाताळगंगा ।

पावसाचे आगमन होण्याच्या आधी खेडेगावात वेध लागायचे ते आपले घरावरती असलेले छपर व्यवस्थित करण्याचे या साठी प्रत्येकाची धडपड सुरु असायची ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कौलारू घरे असल्यामुळे ती कौल सारखी करण्यासाठी प्रत्येकाची लगबग असायची परंतू बदलत्या काळात कौलारू घरे नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने .प्रत्येक व्यक्ती घर बांधताना कौल न वापरता सिमेंटच्या पत्राचा उपयोग करीत आहे.यामुळे मातीची कौल इतिहास जमा होत चालली आहे.

आजही शहरासह खेडेगावही बदलत चालले आहे. सिमेंटच्या जंगलांनी घरे व्यापली जात आहेत. खेड्यातील कौलारू घरासह इतरही अनेक बदल होताना आज आपणस पहावयास मिळत आहे.दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधीच कौलारू घरांची डागडूगी करणे गरजेचे असे यालाच घर फेरणे असे म्हणतात. आज घर फेरणारे कारागीरही दुर्मिळ झाले आहे. कौलारू घर उन्हाळ्यातही गरम होत नाही.यामुळे ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असायची मातीची कौल ही उन्हाचा जाळ स्वत: शोषूण ते आपल्या शरीरापर्यंत नैसर्गिक गारवा पोहचवत असते.

ए.सी. किंवा कुलरची हवा नैसर्गिक नसल्याने एका मर्यादेनंतर त्यांचे दुष्परिणाम शरीरावर निश्‍चितच होताणा आपणास पहावयास मिळत आहे. पण कौलारू घरे उन्हाळ्यात माणसाचे आरोग्य नीट सांभाळून ठेऊन उन्हाळा सुहह्य करत असते.आजही खेड्यात चार दोन घरे कौलारू दिसतात.मात्र नवीन घर निर्मितीच कौलारू घरे बंद होत असल्याने हळू हळू अस्तित्वात असणारी कौलारू घरेही नामषेश होत चालली आहे हे मात्र निश्चित.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.