Press "Enter" to skip to content

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल महानगरपालिकेची शिवसेना शाखा तोड कारवाई परतावली


पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः कळंबोली शिर्के कॉलनी येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची असलेली शाखा पनवेल महानगरपालिका व पोलीस प्रशासन मोठ्या फौजफाट्यासह आज तोडण्यासाठी आले होते. परंतु या कारवाईला शिवसैनिकांनी कडाडून विरोध केल्याने अखेरीस अतिक्रमण विभागाला माघार घेत परतावे लागले आहे.

शिवसेना पक्षाची शाखा म्हणजे शिवसैनिकांची एक अस्मिता आहे व मंदिर आहे. परंतु आज पनवेल महानगरपालिका तसेच प्रशासन यांनी ही शाखा तोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु याला रस्त्यावर उतरुन शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्यासह उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, पनवेल तालुका संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, अ‍ॅड.समाधान काशिद, शहरप्रमुख सुर्यकांत म्हसकर, संदीप तांडेल, महिला आघाडीच्या ज्योती मोहिते, जमील खान, विश्‍वास पेटकर आदींसह मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी उपस्थित राहून या कारवाईला ठोस विरोध केला.

या संदर्भात कळंबोली पोलीस ठाणे व पनवेल महानगरपालिका यांना निवेदन देवून ही कारवाई न करण्यासंदर्भात शिवसेनेतर्फे मागणी करण्यात आली आहे. अखेरीस पनवेल महानगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला कारवाई न करता मागे हात हलवत परत जाण्याची वेळ आली.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.