
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः युवासेना सचिव तथा मावळ लोकसभा युवासेना संपर्कप्रमुख, गटनेते, नगरसेवक, पिंपरी चिंचवड महापालिका विश्वजीत श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली तर पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक प्रथमेश सोमण तथा उपजिल्हाप्रमुख परेशभाई पाटील यांच्या नेतृत्वात एस. आय. आर. संबंधी बी. एल. ए. नेमणुका व इतर संघटनात्मक विषयांवर प्रमुख पदाधिकार्यांची पनवेल मध्ये यशस्वी बैठक संपन्न झाली.
या बैठकीस विधानसभेचे संपर्कप्रमुख राजेंद्र यादव, युवा सेना लोकसभा अध्यक्ष पराग मोहिते, विधानसभा प्रमुख नितीन काळे, महिला तालुकाप्रमुख मंदाताई जंगले, उपमहानगरप्रमुख सचिन मोरे, महेश सावंत, उपतालुकाप्रमुख जगदीश ठाकुर, महानगर समन्वयक डी एन मिश्रा, उपविधानसभाप्रमुख डॉक्टर प्रशांत कदम, खारघर शहर प्रमुख प्रसाद परब, नवीन पनवेल शहर प्रमुख अतुल मोकल, उपमहा नगर समन्वयक राहुल गोगटे, सुजन मुसलोन्डकर, पनवेल शहरप्रमुख प्रसाद सोनावणे, उपतालुकाप्रमुख राकेश भोईर, विश्वास पाटील, कैलास माळी, दिनेश मांडवकर, तळोजे शहर संघटक राहुल कदम, तळोजे एमआयडीसी प्रमुख प्रकाश म्हात्रे, उपतालुका संघटक नरेश नरसिंगे, कळंबोली महिला शहरप्रमुख ज्योतीताई पाटील, नवीन पनवेल महिला शहर प्रमुख माया देवडे, पनवेल शहर प्रमुख प्रीती खानविलकर, शहर संघटिका अर्चना जाधव, खारघरच्या सौ भाग्यश्री कदम, विभागप्रमुख नयना सुरते, उपतालुकाप्रमुख स्मिता भोईर, पूर्णा पाटील, शिवसेनेच्या शीख सेलचे नरेंद्रसिंग होटी, पनवेल शहर संघटक अभिजीत साखरे, पनवेल उपशहर प्रमुख शैलेश जगनाडे, प्रसिद्धी प्रमुख तौपिक बागवान, किरण पवार, यासह पनवेल शहरातील प्रमुख पदाधिकारी युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी व युवासैनिक तथा महिला आघाडीच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या बैठकीत आत्तापर्यंत नेमणूक करण्यात आलेल्या बी.एल.ए. 2 याचा आढावा घेतला गेला तर उर्वरित बी.एल.ए यांची नियुक्ती करून त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्याच्या सूचना विश्वजीत बारणे यांनी केली. तर संघटनात्मक अंतर्गत बदलांचे ही संकेत विश्वजीत बारणे यांच्यातर्फे देण्यात आले. या बैठकीत पदाधिकार्यांनी एस आय आर संबंधी प्रश्न विचारून माहिती घेतली तर संघटनेतल्याही अनेक अंतर्गत बाबींवर उघडपणे चर्चा केली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेल्यानंतर पहिल्यांदाच विश्वजीत बारणे यांनी पनवेल दौरा केला असल्याने पनवेल शिवसेना विधानसभेतर्फे त्यांच्या सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच प्रकट मुलाखती पनवेलमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती विश्वजीत बारणे यांनी दिली.



Be First to Comment